जिल्ह्यात कोरोनाचा कहर, आणखी 51 बाधितांची भर !


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनानं अक्षरशः कहर केलाय. रोज-दररोज बाधितांची संख्या वाढतच चाललीये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन नानाविध उपाययोजना राबवत असूनही हा कोरोना काही जिल्ह्यातून हद्दपार होण्याचं नाव घेईना. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात आणखी 51 पॉझिटिव्ह आढळून आले मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा तपशील कळू शकला नाही. दरम्यान,  विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 जणांना  डिस्चार्ज देऊन दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे

जावली : आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बीरमानेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील अनुक्रमे 57, 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष कोरेगाव : चौधरीवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, दुरगळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, कराड : महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, तारुख येथील अनुक्रमे 22, 54, 32 व 35 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षीय बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, घोलेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील 1 पुरुष, खंडाळा : शिरवळ येथील न्यू कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, येलगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोली येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष, वाई : धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा : दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष, पाटण : उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोडरी येथील  34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष, फलटण : रविवार पेठ येथील अनुक्रमे 68, 25, 62 व 60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, अशा 48 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

523 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 57, ग्रामीण रुग्णालय (फलटण) येथील 20, कोरेगाव येथील 27, वाई येथील 40, शिरवळ येथील 92, रायगाव येथील 23, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 13, पाटण येथील 79, खावली येथील 28 अशा एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

‘तो’ व्हायरल मेसेज पूर्णतः बनावट !
सातारा जिल्हाधिकार्‍यांकडून सूचित करण्यात येत आहे, की लवकरच कोरोना तिसर्‍या स्टेजला पोचेल. आपण सगळ्यांनी आता अतिदक्षता पाळायची आहे… अशा आशयाचा मेसेज सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र अशा प्रकारची कुठलीही बातमी किंवा सूचना वजा मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसिद्धी केला गेलेला नाही. त्यामुळे हा मेसेज पूर्णपणे बनावट असून त्यावर विश्वास ठेवू नये अथवा तो समाजमाध्यमांद्वारे व्हायरल करु नये, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. चिकन मटन बंद, शेजारी-पाजारी बंद, कोणासोबत फिरणे बंद अशा 17 सूचना या मेसेजमध्ये दिल्या गेल्या असून हा मेसेज पूर्णतः बनावट असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या बनावट मेसेजला सातारकरांनी अजिबात भुलू नये, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!