जिल्ह्यात कोरोनामुक्तांच्या संख्येचा आलेख चढता

आठवडाभरात 136 जण बरे होऊन परतले घरी; एकूण 643 जण कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प स्पेशल) : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्तांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात 15 ते 21 जून म्हणजे आजअखेर 136 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. आता ही एकूण संख्या 643 इतकी झाली आहे. या आठवड्यात 84 पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत चालली असून आजमितीस ही एकूण संख्या 818 वर जाऊन पोचली आहे. या आठवडाभरातील कोरोनाविषयक परिस्थितीवर ‘भूमिशिल्प’ने टाकलेला हा दृष्टिक्षेप…

आठवडाभरात 136 जण कोरोनामुक्त
मागील रविवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 510 इतकी होती. आज रविवार अखेर ही संख्या 643 वर जाऊन पोचली आहे. या आठवडाभरात 136 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. 
आठवडाभरात 84 जण पॉझिटिव्ह
मागील रविवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 734 इतकी होती. आज रविवार अखेर ही संख्या 818 वर जाऊन पोचली आहे. या आठवडाभरात 84 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आठवडाभरात 5 जणांचा मृत्यू
मागील रविवारपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 34 इतकी होती. रविवार अखेर ही संख्या 39 वर जाऊन पोचली आहे.  या आठवडाभरात 05 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 
136 जणांवर उपचार सुरू
मागील रविवारपर्यंत जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये 198 जण उपचारासाठी दाखल झाले होते. आज रविवार अखेर ही संख्या 136 वर येऊन पोचली आहे. 
जिल्ह्यातील आठवडाभरातली कोरोनाविषयक परिस्थिती पाहाता कोरोनामुक्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. येणार्‍या नजीकच्या काळात हे असेच चित्र पाहायला मिळाले तर सातारा जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही.


कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही शासनाच्या निर्देशानुसार, 4 डीसीएच (Dedicated Covid Health Centre), 4 डीसीएचसी (Dedicated Covid Health centre) आणि 16 कोविड केअर सेंटर अशी त्रिस्तरीय रचना संपूर्ण जिल्ह्यात उभारली आहे. 27 एप्रिल रोजी शासनाने कळविलेल्या सुधारित निर्देशानुसार, उपचार आणि व्यवस्थापनात बदल करण्यात आला असून डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक आणि कर्मचारी वर्ग यांच्या मेहनतीमुळे कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे.
– डॉ.आमोद गडीकर 
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा


आजअखेर आमच्या इथे 269 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. त्यातील 206 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले तर 48 जणांवर उपचार सुरू आहेत. अद्ययावत खउण, 110 कॉट्स, 4 व्हेंटिलेटर, 45 मॉनिटर अशी उत्तम सुविधा इथे उपलब्ध असून आम्ही सर्व रुग्णांना नाश्ता  व दोन वेळचे हाय प्रोटीनयुक्त जेवण अगदी मोफत पुरवित आहोत. 
– डॉ.ए.वाय. क्षीरसागर 
डीन, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड








error: Content is protected !!