जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू ; 165 पॉझिटिव्ह


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच असून आजही 165 जण पॉझिटिव्ह आढळले. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 49 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, राज्य शासनाने 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून सर्व दुकाने आणि आस्थापना स. 9 ते सायं. 7  पर्यंत सरू करण्याचा आदेश काढला असून शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क वापरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. 

दोन बाधितांचा मृत्यू

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे कोयनानगर ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष तसेच कराड येथील खासगी हॉस्पीटल येथे मंगळवार पेठ कराड येथील 80 वर्षीय महिला अशा दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बुधवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, 7 वर्षीय बालक, 60,38 वर्षीय पुरुष, 42, 48, 32, 27 वर्षीय महिला, 5,2 वर्षीय बालीका, घरलवाडी येवती येथील 66 वर्षीय महिला, रेठरे बु. 35 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील  20,44 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 6, 14 वर्षीय बालक, विद्यानगर येथील 60 वर्षीय पुरुष, शि. हॉ. कॉ. कराड येथील 47, 46 वर्षीय पुरुष,  सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष व 26, 27 वर्षीय महिला, टेंभू येथील 65 वर्षीय पुरुष, कामठी येथील 67 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 45,42 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, इंदोली येथील 30 वर्षीय पुरुष, शिनवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 26 वर्षीय डॉक्टर व 25, 30, 33, 30, 32, 33, 26, 48, 52, 28 वर्षीय पुरुष व 32, 43, 42, 38 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरुष, सदाशीवगड येथील 31 वर्षीय महिला, पाडळी येथील 50 वर्षीय पुरुष,मोपसे येथील 23 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय महिला, बनवडी कॉलनी येथील 40 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 44, 62 वर्षीय पुरुष व 54, 24 वर्षीय महिला, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35 वर्षीय महिला व 14, 7 वर्षीय बालके, शुक्रवार पेठ येथील 28, 58 वर्षीय महिला 16 वर्षीय तरुणी व 25 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 40 वर्षीय महिला, कराड येथील 39 वर्षीय महिला, मलकापूर येथील 23, 49 वर्षीय महिला व 33, 55, 42 वर्षीय पुरुष, वाई : शांतीनगर येथील 15 वर्षीय बालक, 45, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष, सातारा : कारंडी येथील 50 वर्षीय महिला, सदर बझार येथील 30 वर्षीय महिला, लिंब येथील 21, 54, 21 वर्षीय महिला, व 10, 2, 9 वर्षीय बालीका व 9, 5 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 26, 45 वर्षीय पुरुष,  28,  44 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालक, लक्ष्मी टेकडी येथील  31, 24, 50, 60, 47, 40  वर्षीय महिला व 56, 35 वर्षीय पुरुष, संभाजी नगर येथील 41 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 32 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालक, काशीळ येथील 36 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 32 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 92, 58, 52 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, कामथे येथील 40 वर्षीय महिला, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, पाटण : कासरुंड येथील 52 वर्षीय पुरुष, पाटण येथील 33 वर्षीय पुरुष, खटाव : पुसेसावळी येथील 66 वर्षीय पुरुष, मायणी येथील 22, 19 वर्षीय पुरुष, पुसेगांव येथील 34 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : रांजनवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय बालक, खंडाळा : शिरवळ येथील 14 वर्षीय बालक, 30 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, फलटण : बरड येथील 28 वर्षीय महिला व 7 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 45, 31 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, कोरेगांव : तडवळी येथील 63 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 21 वर्षीय महिला, वाठार येथील 70, 51 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय बालीका व  12 वर्षीय बालक, जावली : खरोशी येथील 66 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 57 वर्षीय महिला असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आणखी 165 जण बाधित
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 165 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील रात्री प्राप्त होऊ शकला नाही.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
महाबळेश्वर :
गोडवली येथील वय 18, 27, 20, 17, 36 वर्षीय पुरुष, वाई :  सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, परखंदी येथील  37, 11, 76, 39, 14, 11, 36 वर्षीय पुरुष व वय 57, 67 वर्षीय महिला, सातारा : सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 50 वर्षीय महिला, जिहे येथील 65 वषी्रय महिला,  गोडोली येथील 62 वर्षीय महिला, कराड : चचेगाव येथील 28 वर्षीय पुरुष,  तारुख येथील 60 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, गुढे येथील 64 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 76, 40  वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, कराड शहरातील जूनी पोलीस वसाहत येथील 33 वर्षीय पुरुष,  आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, किवळ येथील 56 वर्षीय महिला, व 31 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 62 वर्षीय  पुरुष, कालवडे येथील 58 वर्षीय महिला, जावली : सायगाव येथील 22, 34 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक, खटाव : मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष, पाटण : कुसरुंड येथील 47 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 47 वर्षीय पुरुष, कासाणी येथील 75 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 12, 50, 25, 60 वर्षीय महिला, करळे येथील 48 वर्षीय पुरुष, तारळे येथील 25 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, मिरगाव येथील 18 वर्षीय युवती अशा 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

524 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना 
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 43, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 70, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  16, कोरेगांव येथील 25, वाई येथील 59, शिरवळ येथील 66, रायगाव 28, पानमळेवाडी 9, मायणी 49, मायणी 37, महाबळेश्वर 20, पाटण 44,  खावली येथे 4 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 103 असे एकूण  524 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले. 

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील सदर बझार (गर्व्हमेंट क्वाटर्स),  तसेच तालुका शाहूपुरी (गडकरआळी, भैरवनाथ कॉलनी,  अथर्व अपार्टमेंट, दत्तछाया कॉलनी, समता पार्क), कोडोली (संवर्धनी अ‍ॅग्रो कंपनी परिसर), निगडी तर्फ सातारा (विठ्ठल मंदिर परिसर), पोगरवाडी (जानाई मंदिर परिसर), सोनापूर (शाळेचा माळ परिसर), लिंब (ढगेवाडी) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केले आहे.
error: Content is protected !!