जिल्ह्यात दिवसभरात 27 पॉझिटिव्ह; 25 कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) :  जिल्ह्यात आज सोमवारी दिवसभरात 27 पॉझिटिव्ह आढळून आले तर 25 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
जावलीमधील गांजे येथील 24 वर्षीय तरुण, म्हाते खुर्द येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा, कराडमधील तारुख येथील 20 वर्षीय 2 तरुण व 24 वर्षीय तरुण, कोयना वसाहत येथील 40 वर्षीय पुरुष, पाटणमधील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय तरुण, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, फलटणमधील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक, कोरेगावमधील 26 वर्षीय महिला, खटावमधील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष आणि 2 वर्षीय बालक, म्हासुर्णे 18 वर्षीय तरुणी, सातार्‍यामधील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण, वडुथ येथील 63 वर्षीय पुरुष, कोरेगावमधील नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष.
आणखी 25 जण कोरोनामुक्त 
दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमधून आज 25 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 248 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


जिल्हाधिकार्‍यांकडून डॉक्टरांचे तोंडभरून कौतुक
‘कोरोनामुक्तीचा ध्यास घेऊन कोरोनाशी लढणार्‍या जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी डॉक्टरांना सातारा जिल्हावासीयांतर्फे माझा सलाम,’ असे गौरवोद्गार काढत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टरांचे तोंडभरून कौतुक केले. ‘सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय असो, जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये असो किंवा विविध खासगी रुग्णालये असो;  या सर्व ठिकाणी काम करणार्‍या डॉक्टरांमुळे अनेक जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी जात आहेत. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टरांचेही या कामी महत्त्वाचे योगदान असून केंद्र सरकारच्या आरुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार त्यांच्याकडून विविध कोरोना केअर सेंटरमध्ये होत असलेले काम कौतुकास्पद आहे. जिल्हा हद्दीवर तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या डॉक्टरांकडून उल्लेखनीय काम होत आहे,’ असेही सिंह म्हणाले. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतील नर्सेस, सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी ताई या सर्वांचेही मी कौतुक करतो, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!