जिल्ह्यात मृत्यूदर काही केल्या कमी येईना..!


दिवसभरात सात जणांचा मृत्यू ; 290 पॉझिटिव्ह,283 कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढत असून एकूण बाधितांची संख्या 7 हजार 883 इतकी झाली आहे. सोमवारी
सात कोरोनाबाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर आणखी 290 बाधित आढळून आले. दरम्यान, आज 283 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. .

सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सातारा येथील केसरकर कॉलनी सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कराडातील शनिवार पेठेतील 55 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष,  धामणी, ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष तसेच सातार्‍यातील खासगी रुग्णालयात ओंड ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष व पाटखळ ता. सातारा येथील 66 वर्षीय महिला, अशा एकूण सात कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

रविवारी प्राप्त अहवालानुसार कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
 फलटण : फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 3,  लोहार गल्ली 2, रविवार पेठ 1, मारवाड पेठ 1,  निंभोरे 1,  साखरवाडी 2, विडणी 1, वाई : वाई शहरामध्ये रविवार पेठेतील न्हावी आळी  1,  सुरुर 1, बेलमाची 3, जेधेवस्ती वारागडेवाडी भूईज 2, धर्मपूरी 1, कोंढवली 4, सातारा :  सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, आकाशवाणी झोपडपट्टी 1, शाहूनगर 1, गुरुवार पेठ 9, सातारा 7, दुर्गापेठ 3,  शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, गुरुवार परज शनिवार पेठ 1, मल्हारपेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, जानाई कॉलनी 1, फडतरवाडी 2, खेड 2,  गोखलेनगर 1,  भादवडे 1, धनगरवाडी 1, भरतगाववाडी 1, पाटखळ 1, खोदड 1, पिरवाडी 1, नागठाणे 5, धावडशी 3, विकासनगर 9, कोडोली 1, गोडोली 1,  संगमनगर 1, आरफळ 1, कण्हेर 1, समर्थनगर 1,  अतित 1,  ब्राम्हणवाडी (तासगाव) 1, चिंचणेर निंब 2, कराड : कराड शहरातील आझाद चौक 1, कापील 2, रेठरे बुद्रुक 1, कराड 4, गोटे 1, मलकापूर 1, प्रकाशनगर 1, शिरवडे 1, होळ 2, बनपूरी 1, उंब्रंज 1,  जखीणवाडी 2, सैदापूर 1, पाटण : ढेबेवाडी 14, पाटण 2, धामणी 1, कडवे बुद्रूक 1, बनपूरी 1, मोरेवाडी-मालदन 1, महाबळेश्वर : पाचगणी 5, गोगवे 27, नगरपालिका 8, डॉ. साबणे रोड 2, देवळी मुरा 3, तालदेव 4, कोरेगाव : गोगावलेवाडी 1,  आसनगाव 4, कोरेगाव 4,  कुमठे 1, पिंपोड बुद्रुक 1, खटाव : तडवळे 1, माण : म्हसवड 1, जावळी : मोरघर 8,  मेढा 4 , एरणकरवाडी 2, रिटकरवाडी 1, दापवडी 1, खंडाळा : वडवाडी 3, पारगाव खंडाळा 2, शिरवळ 1, पाडळी 1, धावडवाडी 1, गोटमाळ लोणंद 2 पळशी 2 जणांचा समावेश आहे, असे बाधित आळून आले आहेत.  

आणखी 290 जण बाधित
रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 290 जण कोरोनाबाधित आढळले मात्र त्यांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

283 नागरिकांना डिस्चार्ज 
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली : 28, कराड : 73, खंडाळा : 28, खटाव : 14, कोरेगांव : 20, महाबळेश्वर : 5, माण : 1, पाटण : 9, फलटण : 18, सातारा : 52, वाई : 35  अशा 283 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

672 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना 
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 112, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगाव 50, वाई येथील 55, खंडाळा येथील 62, रायगाव 30,  मायणी येथील 45, महाबळेश्वर येथील 100, पाटण येथील 7, दहिवडी येथील 35 अशा एकूण 672 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील गोडोली ( प्रथमेश अपार्टमेंट ,मोरे कॉलनी),गुरुवार पेठ, शनिवार पेठ,यादोगोपाळ पेठ (श्रीवर्धन अपार्टमेंट), गुरुवार पेठ (सुमित्रा रेसिडेन्सी ),तसेच तालुका हद्दीतील सैदापुर (आदित्यनगर), खेड ( विकासनगर, भोसले चाळ),सैदापुर (जगदेश्वर कॉलनी) शाहूपुरी(करंजे तर्फ जीवनगंगा पार्क),संगम माहुली (जवळ फाटा परिसर),धनगरवाडी (श्रीराम सोसायटी),शाहूपुरी(करंजे तर्फ सागरकन्या कॉलनी) या परिसरात प्रांत मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.



error: Content is protected !!