जिल्ह्यात तीन बाधितांचा मृत्यू, 74 जण पॉझिटिव्ह


दिवसभरात 27 जण पूर्णपणे बरे होऊन परतले घरी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर बुधवारी दिवसभरात 74 जण पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनामुक्त झालेल्या 27 जणांना दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


तीन बाधितांचा मृत्यू
सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेला जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय आणि पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुष तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे दाखल करण्यात आलेला पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुष या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिवसभरातील कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे (एकूण 07)
सातारा : चोरगेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, खंडाळा : पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 27 महिला, फलटण : जाधववाडी येथील 12 वर्षीय युवती, फरांदवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, कोरेगाव : फडतरवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, खटाव : पुसेगाव येथील 35 वर्षीय महिला, असे  7 बाधित आढळले आहेत. तर बुधवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील आणखी 67 जण कोरोनाबाधित आढळून आल्याने दिवसभरात 74 बाधितांची नोंद झाली आहे. 

मंगळवारी रात्री उशिरा हाती आलेल्या  कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे (एकूण 46)
पाटण : गोकुळ येथील 29 वर्षीय महिला, कोयना नगर येथील अनुक्रमे 45, 48 व 60 वर्षीय पुरुष, कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, दबाचामाळ येथील 14 वर्षीय युवक, कडवे बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 85 वर्षीय महिला, माण : म्हसवड येथील 53 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवती, दोरगेवाडी येथील 22, 55, वर्षीय महिला व 13 व 19 वर्षी युवती, 40 वर्षीय पुरुष, इंजबाव येथील 28 वर्षीय पुरुष, मार्डी येथील 42 वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, कराड : तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, कोटीवले येथील 30 वर्षीय महिला, तारुख येथील 26 वर्षीय महिला, शामगाव येथील 49 वर्षीय पुरुष, सुपणे येथील 28 वर्षीय पुरुष, सातारा : जिहे येथील 7 वर्षीय बालक, खावली येथील 52 वर्षीय पुरुष, जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, 70 व 85 वर्षीय महिला, भरतगाव येथील 48 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 32 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर (सातारा) येथील 45 वर्षीय पुरुष, वाई : केंजळ येथील अनुक्रमे 23, 48 व 27 वर्षीय पुरुष तसेच अनुक्रमे 48, 70, 30 व 25 वर्षीय महिला, पसरणी येथील 30, 52 व 44 वर्षीय महिला, जावली : पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुष, कास येथील 38 वर्षीय पुरुष.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
खटाव : बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड : चचेगाव येथील 45 वर्षीय महिला व 20 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 45 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 8 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, जावली : रामवाडी येथील 48 व 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष व 5 वर्षीय बालक, वाई : बावधन येथील 57 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 37 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा : नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष, सातारा येथील 26 वर्षीय पुरुष, वडूथ येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण : शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील 65 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, फलटण : रविवार पेठ येथील 45 व 27 वर्षीय महिला, अनुक्रमे 9, 6 व 4 वर्षीय बालिका आणि 7 वर्षीय बालक, असे 27 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

371 जणांचे नमुने पाठविले तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय (सातारा) येथील 14, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 53, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 20, वाई येथील 24, शिरवळ येथील 32, रायगाव येथील 24, पानमळेवाडी येथील 39, मायणी येथील 19, महाबळेश्वर येथील 3, दहिवडी येथील 30, खावली येथील 22 अशा एकूण 371 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


सातारा तालुक्यातील बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपरिषद हद्दीतील यादोगोपाळ पेठ, तालुका हद्दीतील कण्हेर, भरतगाव, खावली, गोजेगाव, शिवाजीनगर या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरिता असणारी वेळ जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. तसेच जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.

लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीला आता फक्त 20 व्यक्तींना परवानगी : शेखर सिंह
जिल्ह्यात लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी कार्यक्रमांना 50 व्यक्तींपर्यंत सामाजिक अंतर ठेवून परवानगी देण्यात आली होती मात्र या ठिकाणी गर्दी होत असल्याचे तसेच सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने ही मर्यादा आता 20 व्यक्तींपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
दरम्यान, या कार्यक्रमांसाठी जिल्ह्याबाहेरील वधू/वर वगळून इतर व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणताही कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे शिवाय प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील व्यक्तींना अशा प्रकारच्या कार्यक्रमांना बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.
error: Content is protected !!