Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
जिल्ह्यात उद्योगांचे पुनश्च हरी ओम !
सातारा जिल्हा
जिल्ह्यात उद्योगांचे पुनश्च हरी ओम !
17th June 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा नेहमीच विविध क्षेत्रांत आघाडीवर राहिला आहे. भौगोलिकदृष्ट्या उद्योग क्षेत्र आणि व्यवसायास पूरक असलेल्या या जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय, सेवा उद्योग आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या वतीने 18 व 19 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या मेळाव्यानिमित्त जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायाचा हा लेखाजोखा…
कोरोनामुळे जगभरात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून भारतालाही याची झळ बसली आहे. याचा सर्वांत मोठा फटका बसला तो देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणार्या उद्योगांना. देशासह राज्यातील तसेच जिल्ह्यातील देखील हजारो उद्योग यामुळे बंद झाले. टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी सातारा जिल्ह्यात मोठ्या, मध्यम आणि लघु स्वरुपाच्या नोंदणीकृत उद्योगांची संख्या 20 हजार 432 इतकी होती. मात्र मार्च अखेर पर्यंत ही संख्या कमी होऊन केवळ अत्यावश्यक असलेले 188 उद्योगच सुरु राहिले. लाखो मजुरांच्या हातचे काम गेले.
20 एप्रिलनंतर अर्थव्यवस्थेची
घसरलेली गाडी पुन्हा रुळावर
जिल्ह्यात 20 एप्रिलपर्यंत उद्योगांमधील केवळ 6 हजार 609 कर्मचारी कामावर राहिले. 20 एप्रिल नंतर मात्र अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगांना मोठ्या प्रमाणावर मुभा दिली. त्याचसोबत काही योजना देखील जाहीर केल्या. उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी असेल किंवा कर्ज स्वरूपात लागणारी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे असेल याबाबत सरकारने तत्परतेने पावले टाकली. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत सुरू असलेल्या अवघ्या 188 उद्योगांसोबत 20 एप्रिल आणि मे अखेरपर्यंत आणखी 800 उद्योग पुन्हा सुरू झाले. त्याचबरोबर आणखी 7 हजार 745 कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. असे करत करत जून उजाडेपर्यंत एकूण 988 उद्योगांनी ’पुनश्च हरी ओम’ म्हटले. जवळपास 14 हजार 354 कर्मचारी पुन्हा आपल्या कामावर परतले. मात्र जिल्ह्यांतील उद्योग अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. उद्योगांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी स्थानिक युवक आणि उद्योजकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. तंत्रज्ञान, खाद्यनिर्मिती, शेती आदींशी संबंधित क्षेत्रांतील आणखी उद्योग पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात 25 मे अखेर श्रमिक एक्सप्रेसने परराज्यात 16 हजारांच्या दरम्यान मजूर आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. तसेच खाजगी बसेस, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेही शेकडो श्रमिक त्यांच्या त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे या निमित्ताने उद्योग-धंद्यांत निर्माण झालेली ही पोकळी पुन्हा भरून काढण्यासाठी नव्या दमाच्या आणि नव्या संकल्पनेच्या स्थानिक तरुणांची जिल्ह्यात मोठी गरज निर्माण झाली आहे. नवीन उद्योजकांनाही गुंतवणुकीसाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या निमित्ताने एक संधी उपलब्ध झाली आहे. चला तर मग नव्या संधी शोधू या, नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया आणि संधीचं सोनं करू या…!
– जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
लॉकडाऊनमध्ये पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक वगळून इतर उद्योग जवळपास बंद होते. दुसर्या आणि तिसर्या टप्प्यामध्ये उद्योग पुन्हा सुरु झाले. त्यानंतर आता जिल्ह्यातील औद्योगिक परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे स्थलांतरित मजुरांच्या जाण्याने निर्माण झालेल्या जागांवर भूमिपुत्रांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकरी मेळावा व भरती प्रक्रिया कार्यक्रम जिल्ह्यात सुरु होत आहे. तसेच उद्योजकांच्या इतर काही समस्या जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे.
– संदीप रोकडे,
महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सातारा
लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर वस्तू आणि सेवा यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्व उद्योजकांनी आपल्या अनुभवी आणि पूर्वीपासून कामावर असलेल्या कामगारांना कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी करू नये. कारण वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाल्यानंतर उत्पादन वाढीचे लक्ष्य सर्वांना गाठावे लागणार आहे. त्यावेळी आपल्या अनुभवी सैन्याची नितांत गरज उद्योजकांना पडणार आहे. परप्रांतीय कामगार, विस्थापित कामगार तात्काळ कामावर रुजू होतीलच असे नाही तरी त्यांच्या अनुपलब्धतेमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
– सचिन जाधव
सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता, सातारा.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
उद्योजकांनो, भूमिपुत्रांना प्राधान्य द्या : शंभूराज देसाई
… अन्यथा निळे कफन, काळे मास्क लावून आंदोलन
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.