जिल्ह्यातील 21 पोलिसांना लागण : सुहास वारके

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) :जिल्ह्यात आतापर्यंत 21 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिस विभाग आणि प्रशासनाकडून जिल्ह्यातील पोलिसांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेतली जात आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक सुहास वारके यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पोलिसांचे कार्य आणि त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी वारके सातार्‍यात आले होते. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली.
error: Content is protected !!