जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक

जिल्ह्यात 888 पॉझिटिव्ह तर 689 कोरोनामुक्त; दिवसभरात 22 पॉझिटिव्ह; 9 जण परतले घरी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात गुरुवारी आणखी 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 9 जणांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.  यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 888 इतकी झाली असून आजपर्यंत 689 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

 कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
कराड : उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगाव येथील अनुक्रमे 53, 28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, कोरेगाव : नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा व 14 वर्षांची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, फलटण : रविवार पेठ येथील अनुक्रमे 68, 25, 62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 35 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, वाई : सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष, जावली : रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, पाटण : चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष असे एकूण 22 कोरोनाबाधित आढळले आहेत.
आणखी 9 जण कोरोनामुक्त
विविध रुग्णालयांतून व कोरोना केअर सेंटरमधून उपचार घेवून बरे झालेल्या 9 जणांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
 माण : म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय पुरुष, कराड : म्हासोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव : कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष, अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव : मायणी येथील 37 वर्षीय पुरुष, वाई : शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, शेलारवाडी (बावधन) येथील 49 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष अशा 9 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 
190 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 14, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 29, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 53, ग्रामीण रुग्णालय (वाई) येथील 17, शिरवळ येथील 10, रायगाव 13, पानमळेवाडी 8, मायणी 16 व पाटण येथील 30 अशा एकूण 190 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 
 166 जणांचे नमुने निगेटिव्ह
एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांच्याकडून 166 जणांचे नमुने निगेटिव्ह प्राप्त झाल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
error: Content is protected !!