जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या सव्वासहाशे !

दिवसभरात 4 जण पॉझिटिव्ह, 19 जणांना डिस्चार्ज
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 4 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 19 जण कोरोनामुक्त  होऊन आपापल्या घरी परतले. दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातील 4 बाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात उपचार घेत असले तरी बाधित रुग्ण म्हणून त्यांची त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात गणना झाली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील बाधितांच्या एकूण संख्येतून ते वजा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. 


चिखलीतील एकाचा नमुना मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह चिखली (ता. कराड) येथील 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 804 इतकी झाली असून, 624 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला असून उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या 141 इतकी झाली आहे.
कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
सातारा : सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 54 वर्षीय महिला, कराड : तळबीड येथील 26 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला, पाटीलवाडी (म्हासोली), येथील 48 वर्षीय महिला, असे चार कोरोनाबाधित आढळले आहेत.
212 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 8, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 27, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 35, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 22, कोरोना केअर सेंटर (शिरवळ) येथील 11, रायगाव येथील 26, पानमळेवाडी येथील 7, मायणी येथील 25, महाबळेश्वर येथील 9, पाटण येथील 42 अशा एकूण 212 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आणखी 19 जण कोरोनामुक्त
विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणार्‍या 19 जणांना आज 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोनामुक्तांचा तपशील पुढीलप्रमाणे 
बेल एयर हॉस्पीटल (पाचगणी) येथून महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 36 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, दाबेकर येथील 36 वर्षीय महिला, महाबळेश्वर येथील 29 वर्षीय महिला कोरोना केअर सेंटर (मायणी) येथून खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील 24 वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील 39 वर्षीय महिला, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथून होळ (ता. फलटण) येथील 60 वर्षीय पुरुष, बोरीव (ता. कोरेगाव) येथील 56 वर्षीय पुरुष, व्याजवाडी (ता. वाई) येथील 22 वर्षीय महिला, कोरोना केअर सेंटर खावली (सातारा) येथून पिंपळवाडी-धावडशी येथील 15 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलगा,  कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील 28 व 40 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 42 वर्षीय महिला, केसे येथील अनुक्रमे 42, 50 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक व 20 वर्षीय युवती, असे एकूण  19 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

कृष्णा’ तून आजअखेर 206 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची आजअखेर एकूण संख्या 624 इतकी आहे. त्यातील 206 जण कराड तालुक्यातील एकट्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील 167 बंदींची तात्पुरत्या जामीनावर कारागृहामधून मुक्तता
कारागृहातील बंदींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका क्र.1/2020 द्वारे दिलेल्या आदेशान्वये तसेच उच्च न्यायालयाच्या राज्य उच्च अधिकार समितीने दिलेल्या निर्देशान्वये सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कारागृहातून एकूण 573 अंतरिम जामीन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 188 अर्ज मंजूर झाले असून दि. 23 मार्च 2020 ते 15 जून 2020 या कालावधीत मंजूर अर्जांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन एकूण 167 बंदींना मुक्त करण्यात आले. संबंधित कारागृहांना जामीनावर मुक्त केलेल्या बंदींना कोरोना संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन घरी पोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




error: Content is protected !!