पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मीडिया चॅरिटेबल फाऊंडेशन व जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले.पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सातारा येथील पत्रकार तन्मय पाटील यांना ‘प्रतिभा गौरव’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून परभणी येथील मीडिया चॅरिटेबल फाऊंडेशन व जनसहयोग सेवाभावी संस्था या संयुक्तपणे सामाजिक उपक्रम राबवित आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना तसेच नीट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्यांचा प्रतिभा गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.तसेच १० वी १२ वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने संस्था करत असते.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सातारा येथील पत्रकार तन्मय पाटील यांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मीडिया चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. कामिनी पाटील, मेहमूद खान, मोईन खान, पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण, पत्रकार शरद गाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी इंजि.आर.डी.मगर, प्रा. अरुण पडघन, अमजद खान, असिफ अन्सारी, अनिताताई सरोदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.