पत्रकार संघाच्या आक्रमक भूमिकेनंतर वाळू माफियांवर गुन्हा दाखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिंती ता.फलटण येथील पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियानी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नसल्याने सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर वाळू माफियांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ केल्याची घटना घडल्यानंतर पत्रकार प्रशांत रणवरे ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस कर्मचारी यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी या घटनेच्या निषेधार्थ एकत्रित येत या घटनेचा निषेध करून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात एकत्रित येत संबंधित आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, असता ग्रामीण पोलिसांनी टाळाटाळ केली.

फलटण शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने सातारा जिल्हा पत्रकार संघटनेच्या पदाधिकारींशी चर्चा केली. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दिपक शिंदे, इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार संघाचे तुषार तपासे, जिल्हा निमंत्रक सनी शिंदे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक सुजित आंबेकर, राहूल तपासे,ओंकार कदम, संतोष नलवडे,अमित वाघमारे,समाधान हेन्द्रे यांनी एकत्र येत तत्काळ दखल घेत अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांच्याशी फोनवरून व तत्काळ आरोपी वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याची मागणी केली. यानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी सातारा येथे येऊन गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घटनेची माहिती घेतल्यानंतर सातारा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झिरो नंबरने पत्रकार प्रशांत रणवरे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत अखेर सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मागणीला न्याय देण्यात आला.

error: Content is protected !!