सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन संशयित गेली काही दिवस सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आला होता. त्याने आज सकाळी बालसुधारगृहात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
खटाव तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन तरूणावर त्याच्याच नात्यातल्या युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याने आज शनिवारी सकाळी बालसुधारगृहातच बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली.
याची माहिती मृताच्या नातेवाइकांना समजताच नातेवाईकांनी बालसुधारगृहा बाहेर गोंधळ केला. यानंतर सातारा शहर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
You must be logged in to post a comment.