कचरावेचकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासह आर्थिक मदत

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त कचरावेचक 
श्रमिक संघ आणि बालाजी ट्रस्टचा संयुक्त उपक्रम


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त कचरावेचक श्रमिक संघ आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज शुक्रवारी कचरावेचक श्रमिक संघाच्या सदस्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य व रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली. राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.

कचरावेचक श्रमिक संघ, कचरा गोळा करणार्‍या बांधवांच्या उन्नतीसाठी गेली 9 वर्षे मदतीचा हात देत आली आहे. आजपर्यंत संघाच्यावतीने 180 सदस्यांच्या पाल्यांना मदत करण्यात आली असून संघाच्या या उपक्रमाबद्दल सदस्यांनी आभार मानले आहेत. कचरा वेचक श्रमिक संघाच्या या  स्तुत्य उपक्रमात आपलाही हातभार लाभावा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सहभाग नोंदवून संघाच्या सदस्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य व रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यासाठी पुढे येऊन संयुक्तपणे कार्यक्रम राबवला. ‘कचरावेचक श्रमिक संघाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून या माध्यमातून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला या मुलांना मदत करण्याची संधी लाभल्याबद्दल मला आनंद होत आहे,’ असे उद्गार राजेंद्र चोरगे यांनी यावेळी काढले.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भिसे, उपाध्यक्ष सचिन पवार तसेच जगदीप शिंदे, राहुल काटेकर उपस्थित होते.




error: Content is protected !!