दळवी कुटुंबाचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम : रमेश लोटेकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :- शिक्षक हा समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त घटक आहे. समाजातील वाईट गोष्टी सांगणे आणि त्यांची दुरुस्ती करणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. हे काम शिक्षिका कल्पना दळवी यांनी नेहमीच केले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर दळवी कुटुंबीय धरणग्रस्तांच्या चळवळीत अग्रस्थानी राहत असतात. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय असेच आहे, असे प्रतिपादन केंद्र प्रमुख रमेश लोटेकर यांनी केले.

सेवानिवृत्त शिक्षकी सौ. .कल्पना दळवी यांचा आंबेवाडी, ता. सातारा येथे ऋणनिर्देश समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री रमेश लोटेकर यांनी भूषविले.  यावेळी हरिश्चंद्र दळवी, गजानन वाईकर, साळुंखे मॅडम, लोंढे मॅडम,अलट सर, सोनवलकर सर,, बाबर मॅडम, रायते उपसरपंच उपस्थित होते. या प्रसंगी सौ दळवी यांनी केंद्रातील सर्व शाळांना सॅनिटाईझर चे कॅन भेट दिले.

लोटेकर म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. आपल्या आई वडिलांप्रमाणेच शिक्षकांनी दिलेले योगदान खुप मोठे असते. लहानपणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात. शिक्षक केवळ ज्ञान देऊन जीवन समृद्ध करत नाहीत तर आयुष्य कसे जगावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा शिक्षक असतो जो विद्यार्थ्यांच्या मनात कायम आदराचे स्थान निर्माण करतो. सौ दळवी यांच्या सेवा कार्यात त्यांनी अनेकांना घडविण्याचे काम केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लांभाते यांनी करून  सौ. कल्पना.दळवी यांच्या सेवा कार्याचा आढावा घेतला. सौ. कल्पना दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या भावभावना कशा प्रकारे जपल्या पाहिजेत, हे सांगितले. निवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकी जपून कार्यकरत राहण्याची ग्वाही दिली. साळुंखे मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांभाते सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी नित्रळ केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!