काळूबाई मंदिरात यात्रा उत्सव साध्या पद्धतीत


वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा आज सोमवार दि १७ पासून सुरू झाली कोरोना रोगाच्या पार्शवभूमीवर व कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने यात्रेवर बंदी घातल्याने काळूबाई मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद होती मांढरदेवीच्या यात्रेसाठी पौष महिन्यामध्ये दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात परंतु मांढरदेव परिसरात १४४ कलम लागू करण्यात आल्याने व यात्रा रद्द झाल्याने प्रशासनाने भाविकांना ३१जानेवारी पर्यंत मांढरदेव येथे येण्यास बंदी घातली त्यामुळे आज मंदिर परिसरात भाविकविना यात्रा संपन्न झाली. दरम्यान काल रात्री देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली व देवीचा जागर निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आज सकाळी देवीचा गोंधळ घालण्यात आला व सहा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मांढरदेव मंगला धोटे यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली.त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन एस जी नंदीमठ,उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जानवे-खराडे,तहसीलदार रणजित भोसले,विश्वस्त अॅड पद्माकर पवार, सीए अतुल दोशी,  चंद्रकांत मांढरे,विजय मांढरे, सुनील मांढरे,सुधाकर क्षीरसागर ओंकार क्षीरसागर, शंकर मांढरे,  सहसचिव लक्ष्मण चोपडे यांच्यासह निवडक पुजारी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्यामुळे काळूबाई देवीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते मांढरदेव परिसरात जमावबंदीचे आदेश दिल्याने पोलीस व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत होते मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी व वाईचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहाय्यक, दहा उपनिरीक्षक ८७ पुरुष २० महिला वाहतूक कर्मचारी २४ होमगार्ड १ दंगा काबू पथक जलद कृती दलाची तुकडी असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मांढरदेवीलायेणार्या भाविकांना भोर येथे शिवाजी चौक व वाई एमआयडीसी त्याचबरोबर कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.

error: Content is protected !!