सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्ट्रीट लाईटचे बील थकीत असल्याने महावितरण कंपनीने हे कनेक्शन तोडले आहे. हे बील ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या रक्कमेतून भरावे, असा शासन निर्णय घेतला. याच्या विरोधात आज सरपंच परिषदेच्यावतीने साताऱ्यात कंदील मोर्चा काढण्यात आला.
गावातील स्ट्रीट लाईटचे बिल कोणी भरावे म्हणून गेल्या तीन वर्षांपासून वाद निर्माण झाला असून यापूर्वी सदरचे बिल हे जिल्हा परिषदेच्या वतीने परस्पर भरण्यात येत होते. त्यापोटी संबंधित ग्रामपंचायतीकडून वसुली करण्यात येत होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास नकार दिल्याने थकबाकी वाढत गेल्याने ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. लाखो रुपये थकबाकी असलेले वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्य शासनाने हे वीज बिल १५ व्या वित्त आयोगातून भरावे, असा निर्णय घेतला आहे.
या निषेधार्थ आज सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंचांनी कंदील मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाण्यास अटकाव केला. त्यानंतर आंदोलक सरपंच पोवई नाका येथील सभापती निवाससमोर आवारात थांबले होते
You must be logged in to post a comment.