प्रियकराच्या मदतीने सख्या बहिणीने केला खून

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कऱ्हाड तालुक्यातील वाखाण भागातील विवाहीता उज्वला ठाणेकरच्या खून प्रकरणी पोलिसंनी संशयीत ताब्यात घेतलेल्या तिच्या सख्या बहिणीसह तीच्या प्रियकराला खून केल्याबद्दल आज सकाळी अटक केली.

ज्योती सचिन निगडे (वय २७, बैलबाजार रस्ता, मलकापूर) व सागर अरुण पवार (२६ रा. साईनगर, मलकापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना चार ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

ज्योतीचा नवरा व उज्वलाच्या खूनातील फिर्यादी सचिनसोबतच्या उज्वलाच्या अनैतिक संबधाच्या रागातून ज्योतीने प्रियकरासोबत तीचा काटा काढल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. उज्वला राहत असलेल्या मागील बाजूच्या शेतातून दोघेजण तीच्या घरी आले. तीचा निर्घृणपणे खून करून त्याच रस्त्याने नदीच्या कडेने ते पसार झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

error: Content is protected !!