कराड-पाटण रस्त्यावर दोन ट्रकच्या धडकेत चालक ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कऱ्हाड-पाटण मार्गावर मुंढे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत जाधव ढाब्याजवळ उभ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकचालक ठार झाला. संजय कुंडलिक दोंदळे (वय ४४, रा. अथणी, जि. बेळगाव) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूणहून बेंगलोरकडे संजय दोंदळे ट्रक घेऊन निघाले होते. कऱ्हाड तालुक्यातील मुंढे गावच्या हद्दीत आल्यानंतर उभा असणार्‍या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात संजय दोंदळे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शहर अपघात विभागाचे प्रशांत जाधव व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी संजय दोंदळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास अपघात विभागाचे पोलीस हवालदार प्रशांत जाधव करत आहेत.

error: Content is protected !!