कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी दि.९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. कोविड-१९ मुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता यावर्षी रविवार दि. ९ मे रोजी होणारा कर्मवीर पुण्यतिथी नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी दिली.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव प्रिं.डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी निवेदनाव्दारे,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने ७ व ८ मे राजी संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा येथे माध्यमिक विभागाकडील शाखाप्रमुख आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालया कडील प्राचार्यांसाठी
शैक्षणिक व्याख्यान सत्रांचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमही रद्द करण्यात आले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!