करंजेकरांसाठी ठोस काही करु शकलो याचे आंतरिक समाधान वाटते : उदयनराजे भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : करंजे या भागात जागृत असे श्रीभैरवनाथ देवस्थान आहे. या परिसराचा विकास आजपर्यंत सातारा विकास आघाडीने नेहमीच प्राधान्याने केला आहे. याही वेळी करंजे भागाचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी सातारा विकास आघाडी कुठेही कमी पडलेली नाही. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि सहका-यांच्या प्रयत्नामधुन एकूण सव्वा तीन कोटींच्या कामाचे भुमिपुजन होत असताना, करंजेकरांसाठी ठोस काही करु शकलो याचे आंतरिक समाधान वाटते असे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.

मेहेर देशमुख कॉलनी येथील १. हरित पटटा विकसित करणे व त्यास संरक्षक भिंत बांधणे या दिड कोटींच्या कामाचे, २. पूर्वीच्या सेनॉर हॉटेल चौक ते करंजे नाका या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या रुपये ७५ लाख रुपयांच्या कामाचा आणि करंजे येथील प्रभाग क्रमांक १० मधील १ कोटींचे अंतर्गत रस्ते डांबरीकरण-कॉक्रीटीकरण करणे या तीन कामांचा भुमिपुजन समारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
आणि मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अँड.डि.जी.बनकर, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, नगरसेवक ज्ञानेश्‍वर फरांदे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरअभियंता दिलीप चिद्रे, प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, करंजे गावालाऐतिहासिक महत्व आहे. करंजे ग्रामस्थ आणि आमचे पूर्वीपासूनच कायमचे क्रणानुबंध राहीले आहेत. आता हदवाढ झाल्याने करंज भागाचा विस्तार झाला आहे. येथील नागरी वसाहती देखिल वाढत आहेत. करंजेकरांवर ग्रामदेवता श्री भैरवनाथाची कृपा आहे. करंजेकरांनी आमच्यावरही कृपादृष्टी नेहमीप्रमाणे जपावी असे भावनिक आवाहन देखिल यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

मेहेर देशमुख कॉलनी येथील हरित पटयाचा विकासकरण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे हे
लक्षात घेवून या ठिकाणी संरक्षक भिंतीचे सुमारे १ कोटी ५० लाखांचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील अंतर्गत रस्ते करण्यासाठी १ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तसेच पूर्वीचा
सैनॉर हॉटेल चौक ते करंजे नाका या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे रुपये ७५ लाखांचे काम हाती घेण्यात आले आहे. ही सर्व कामे मंजूर करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची मान्यता घेण्यासाठी गेलो असता, करंजेच्या विकासाकरीता लागेल ते करा अश्या सक्त सुचना त्यांनी दिल्या घटनेवरुन खासदारांचे मोठया मनाची प्रचिती येते असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी आजी माजी नगरसेवक, करंजेतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!