Skip to content
Tuesday, December 24, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
कसं असणार आहे … गृह विलगीकरण… !!
आरोग्य
सातारा जिल्हा
कसं असणार आहे … गृह विलगीकरण… !!
5th August 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर आरोग्य यंत्रणेच्या तपासाअंती जिल्ह्यामध्ये आता गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. ते उपचार काय आणि कसे असणार आहेत. याबद्दल जनतेत संभ्रम होऊ नये म्हणून एक पुस्तिका ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे. आज ती QR कोड सह सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. काय आहे गृह विलगीकरण यावर प्रकाश टाकणारा हा सविस्तर आढावा…. !!
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 80 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसुन येत नाहीत त्यामुळे या सर्वांचे आता गृहविलगीकरण करुन उपचार करणे शक्य होणार आहे. अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझीटिव्ह रूग्णांना त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
मार्गदर्शक सूचना :
* वैद्यकीय अधिकारी रूग्ण पॉझीटिव्ह आल्यानंतर तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला आहे हे प्रमाणित करतील व गृह विलगीकरणाबाबतची माहिती देतील.
* रुग्णांसाठी खेळती हवा असलेली आणि स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली खोली असणे तसेच घरातील काळजी घेणारी व्यक्ती 24 तास उपलब्ध आवश्यक आहे. नसल्यास रुग्णाची व्यवस्था कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येईल.
* गृह विलगीकरणानंतर पुढील दहा दिवस रुग्णांची नियमीत तपासणी फोनद्वारे करण्यात येईल.
* दहा दिवसांमध्ये कोणतेही लक्षण न आढळल्यास रुग्ण गृह विलगीकरण संपवु शकतो. विषेश बाब म्हणजे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
* घरातील कोणीही व्यक्ती (55 वर्षापेक्षा जास्त वय असलेले) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेय, ह्दयविकार, जुनाट यकृत, फुप्फूस, मूत्रपिंडाच्या रूग्णांची कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी.
* आरोग्य सेतु अॅप असणे आवश्यक. तसेच नोटिफीकेशन्स, ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रॅकिंग पुर्ण वेळ चालु राहणे गरजेचे आहे.
* रुग्ण गृह विलगीकरणात असताना 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईटच्या साहाय्याने सतत संपर्कात येणार्या गोष्टी उदा : स्विच बोर्ड, खिडक्या, दरवाजाचे नॉब, खुर्ची, जेवणाचे टेबल, कपाट इ. साफ कराव्यात.
जिल्ह्यात सध्या 29 कोविड केअर सेंटर आणि 11 कोविड हॉस्पिटल्स् आणि 8 कोविड हेल्थ सेंटरमध्ये 2346 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील 2 महिन्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. इतर शहरांमध्ये अशाच पद्धतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठीच जिल्ह्यात आता गृह विलगीकरण हा पर्याय जिल्हा प्रशासनाने समोर आणला आहे.
रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलऐवजी त्यांच्याच घरी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधीचे आवाहन केले आहे. इतरांशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क येण्यापासून स्वतःला दूर ठेवून विलगीकरण केल्याने या विषाणूचा संसर्ग इतर व्यक्तींनाही होण्याची शक्यता कमी होते. असे ते म्हणाले.
वैद्यकीय मदत घ्या
काळजी घेणार्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे. रुग्णाला धाप लागली, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल असे लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
मानसिक आरोग्य जपा
आयसोलेशनच्या काळात रुग्ण घरीच असला, तरी त्याला आणि घरातल्या इतरांना मानसिक ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. मनात दडपण येऊ शकत, अशावेळी आपले मानसिक संतुलन नीट ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पुरेसा आहार आणि पुरेशी झोप घ्यावी. शक्य झाल्यास प्रतिकारशक्तीसाठी व्यायाम असावा. योग – ध्यान यासारख्या गोष्टी, छंदांची जोपासना, करमणूक -विरंगुळा यासाठी ठेवलेला काळ, आपल्या आवडत्या व्यक्तींशी फोनवरून वा समाजमाध्यमांवरून संवाद साधावा.
मज्जीद कच्छी यांची संकल्पना ठरली उपयुक्त
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकार्यांनी कोरोनासंदर्भात उपाययोजना सुचविण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सातार्यातील बांधकाम व्यावसायिक सलिम कच्छी यांचे चिरंजीव अॅड. मज्जीद कच्छी यांनी ‘होम आयसोलेशन’ संदर्भात उपयुक्त अशा सूचना मांडल्या. त्यांच्या सूचनांचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विचार करुन प्रशासनाने जाहीर केलेल्या होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक पुस्तिकेत समावेश केला. यासंदर्भात मज्जीद कच्छी यांनी संकट काळात आपल्या संकल्पना समाजासाठी उपयुक्त ठरतील या भावनेने या पुस्तिकेसाठी काम केले याचे समाधान मिळाल्याचे ‘भूमिशिल्प’शी बोलताना सांगितले.
कोरोना संसर्गाच्या रूपाने आपल्यावर कोसळलेल्या अभूतपूर्व संकटाचा आपण एकत्रितपणे आणि जिद्दीने सामना करीत आहोत. मात्र संकटाचे स्वरूप आणि टप्पे जसजसे बदलत जातील त्याप्रमाणे आपल्यालाही रणनीती बदलावी लागणार आहे. होम आयसोलेशन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
ना. बाळासाहेब पाटील
(पालकमंत्री-सातारा जिल्हा)
कोविड-19 च्या प्रसारकाळात जिल्हा प्रशासन कायम आपल्यासोबत राहिले असून, आपल्याकडील बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. तेव्हा घाबरू नका. कोरोनाचे 80% रुग्ण घरी राहूनच बरे होऊ शकतात. नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.
शेखर सिंह
(जिल्हाधिकारी, सातारा)
कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात सुरू झाल्यापासून जी आकडेवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे येत आहे, ती पाहता केवळ आकड्यांना घाबरण्याची स्थिती नाही. बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. आणि प्रशासनाचे मार्गदर्शन आणि मदत घेऊन तुम्हीच आपल्या प्रियजनांना घरच्या घरी बरे करू शकता.
संजय भागवत
(मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा)
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द : आ. शिवेंद्रसिंहराजे
जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू : 220 बाधित
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.