सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कास पठारावरील गणेश खिंड परिसरात एक तरुण सेल्फी काढत असताना दरीत कोसळला. त्याला वाचवविण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमने दोन तासाच्या प्रयत्नानंतर संबंधित तरुणाला सुखरुप बाहेर काढला. हा तरुण दरीमध्ये तब्बल २५ तास जखमी अवस्थेत पडला होता.
याबाबत माहिती अशी की, तनिष्क जांभळे (वय २४, रा. समर्थ मंदिर, मंगळवार पेठ, सातारा) हा कास येथे पर्यटनासाठी गेला होता. गणेश खिंड येथील दरीजवळ सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला. दरम्यान, दोन दिवस हा घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान, गणेश खिंड परिसरात त्याची दुचाकी आढळून आली. या घटनेची माहिती मित्रांनी सातारा तालुका पोलिसांना कळवली. पोलिसांनी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नानंतर तनिष्क जांभळे याला दरीतून बाहेर काढले. तनिष्क हा तब्बल २५ तास जखमी अवस्थेत पडला होता. साताºयातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रेस्क्यु आॅपरेशन सुरु असताना परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या मोहिमेत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमच्या चंद्रसेन पवार, विक्रम पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ, अभिजित शेलार आदींनी सहभाग घेतला.
You must be logged in to post a comment.