कासच्या फुलांच्या हंगामाचा शनिवारपासून शुभारंभ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या दुर्मिळ फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठाराचा हंगाम शनिवार दिनांक १० सप्टेंबर पासून सुरू होत आहे दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा फुलोत्सव सुरू होतो परंतु यावर्षी या परिसरामध्ये जास्त पाऊस झाल्याने फुलांचा हंगाम लांबला होता. आता सरतेशेवटी १० सप्टेंबर पासून रंगीबेरंगी फुले पर्यटकांना पाहण्यास मिळणार आहेत.

कास पठार हे दुर्मिळ वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या पठारावरती दृष्टीस पडणारी विविध रंगाची फुलं हे पर्यटकांचे आकर्षणाचा विषय असतो सध्या कास पठारावर तेरडा, गेद, सीतेची आसवे, नीलिमा, आभाळी, चंद्र रानहळद, अबोलीमा, निसुरडी इत्यादी फुले फुलली असून काही काही ठिकाणी फुलांचे ताटवे सुद्धा पाहायला मिळत आहेत शनिवारपासून पर्यटकांसाठी हा नजरांना खुला करण्यात आला असून प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती शंभर रुपये इतके आकारले जाणार आहे दर दिवशी फक्त ३००० पर्यटकांनाच या या ठिकाणी प्रवेश दिला पर्यटकांनी www.kas.ind.in या संकेतस्थळावर जाऊन आपली बुकिंग करावी असे आव्हान कास पठार कार्यकारी समितीआणि सातारा वन विभागाने केले आहे

error: Content is protected !!