Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
सातारा
कासला जाणार्या पर्यटकांवर सरसकट कारवाई नको
सातारा
कासला जाणार्या पर्यटकांवर सरसकट कारवाई नको
30th June 2020
प्रतिनिधी
आ. शिवेंद्रसिंहराजेंची गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मागणी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कास पठार हे जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले पर्यटनस्थळ आहे. कास तलाव आणि कास पठार येथे देशी, परदेशी पर्यटकांसह स्थानिक लोक नेहमीच भेट देत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून कासला जाणार्या पर्यटकांवर पोलीस प्रशासनाकडून सरसकट केली जाणारी कारवाई चुकीची आहे. त्यामुळे पोलिसांनी सरसकट कारवाई न करता हुल्लडबाज तसेच गोंधळ घालणार्यांवर कारवाई करावी पण सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नये, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहाजे भोसले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
गृहमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास पर्यटकांवर होणार्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री बाळसाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांच्यासह सर्व आमदार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक तसेच सातारकर आपल्या कुटुंबीयांसमवेत विरंगुळा म्हणून शनिवार, रविवार अथवा सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने कासला जात असतात. कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाच्या निर्बंधांचे प्रत्येकाने पालन करणे बंधनकारक आहेच पण गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाकडून कासला जाणार्या पर्यटकांवर सरसकट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. लहान मुले, वयोवृध्द आणि महिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. पर्यटकांना काठीने मारण्याचा व्हिडिओसुध्दा व्हायरल झाला असून हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे.
हुल्लडबाज टोळक्यांवर, मद्य प्राशन करुन धिंगाणा घालणार्यांवर आणि बेदरकारपणे वाहने चालवणार्यांवर तसेच कोरोनासंबंधीचे नियम मोडणार्यांवर कारवाई झाली पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही मात्र पोलीस यंत्रणेने सरसकट कारवाई करून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जाणार्या पर्यटकांना विनाकारण त्रास देऊ नये, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी देशमुख यांच्याकडे केली. त्यावर देशमुख यांनी याबाबत पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सूचना उपस्थित अधिकार्यांना केली.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
वाढीव उत्पादनासाठी काटेकोर पद्धतीच्या शेतीची गरज
लॉकडाऊन 5.0 : कोरोनानं दिला सर्वाधिक त्रास !
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.