सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यातील कवठे येथे पती टिव्ही आण्याकरिता घेऊन न गेल्याच्या कारणावरून दुसऱ्या पत्नीने तुळईला साडीच्या काठपदराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पार्वती दगडू फूलसुरे (वय २४, रा. देवनी, आवंडा पो. बडूर ता. निलंगा जि. लातूर सध्या रा. कवठे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील दगडू फूलसुरे हे दोन्ही पत्नीसमवेत कवठे येथे राहतात. दगडू फूलसुरे हे शिरवळ परिसरात मजुरी करतात. सोमवारी दगडू फूलसुरे याला दुसरी पत्नी पार्वती हिने नवीन टिव्ही आणण्याकरिता सांगितले होते. फूलसुरे याने पहिली पत्नी गुणाबाई हिला सोबत घेत टीव्ही आण्याकरिता शिरवळला निघाले. यामुळे पार्वती नाराज झाली होती.दगडू फूलसुरे हा पहिली पत्नी गुणाबाई हिच्यासमवेत शिरवळ येथे टीव्ही आण्याकरिता आला असता पार्वतीने घरामध्ये तुळईला साडीच्या काठपदराने गळफास घेतला. ही घटना निदर्शनास येताच नागरिकांनी पार्वती फूलसुरे हिला शिरवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी पार्वती फूलसुरे हिचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. दगडू फूलसुरे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करीत आहेत.
You must be logged in to post a comment.