केंडबेत महिलांनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी केंडबे येथील सहा जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या गावातील महिलांनी अडवल्या. संबंधित अत्याचाराचा गुन्हा खोटा असून पोलिसांनी तपास करु नये, अशी मागणी या महिलांनी केली.

याबाबत माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी केंडबे येथील अल्पवयीन मुलावर गेल्या वर्षभरापासून सहा जण अत्याचार करीत असल्याची घटना समोर आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी चौघांना अटक केली. तसेच दोघांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक शीतल खराडे, मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्यासह पोलीस फौजफाटा केडंबेत दाखल झाला. यावेळी गावातील महिलांनी पोलिसांच्या गाड्यासमोर ठिय्या मांडून पोलिसांनी तपास करण्यास करण्यास मज्जाव केला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन केले. त्यानंतर महिलांनी पोलिसांना एक निवेदन दिले. यामध्ये अत्याचाराचा गुन्हा खोटा असून या गुन्ह्यात युवकांना जाणीवपूर्णक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी पोलिसांनी तपास करु नये, अशी मागणी केली.

error: Content is protected !!