प्रतापसिंहराजेंचा वसा घेऊन कार्यरत राहू ः खा.उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती प्रतापसिंहराजेंनी जनता व सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू मानून राज्यकारभार केला हाच आणि वसा घेऊन सदैव कार्यरत आहोत, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज परिवहन विभाग एसटी स्टँड परिसर येथे एसटी कर्मचारी बांधवांना खासदार उदयनराजे भोसले यांच्यावतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

गेले ११७ दिवस आपले कर्मचारी बांधव महामंडळाचे विलीनीकरण राज्य सरकार मध्ये करावे या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.
आजच्या घडीला आपल्या या कर्मचारी बांधवांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे याच पार्श्वभूमीवर काही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप उदयनराजे मित्र समूहाकडून करण्यात आले.

उदयनराजे म्हणाले, एसटी कामगारांच्या प्रश्नांबाबत गेले अनेक दिवस आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत तसेच पुढील काही दिवसात यासंदर्भात कामगारांसोबत बैठक घेऊन आवश्यक तो निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे. आपल्या कामगार बंधूंची आजची परिस्थिती पाहून दुःख वाटले, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत कोणत्याही पातळीवर पाठपुरावा तसेच वेळ पडली तर मैदानात उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही हा शब्द देतो.

error: Content is protected !!