रिपाइं विद्यार्थी सेनेच्यावतीने साताऱ्यात ‘खड्डे का बर्थ डे’

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहर आणि परिसरांत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं विद्यार्थी सेनेच्यावतीने साताऱ्यात महामार्गावर अनोखे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करून केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.

रिपाइंच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, पुणे-बँगलोर महामार्गावर प्रचंड मोठया प्रमाणावर खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गावरून सातारा शहरात
प्रवेश करणा-या ठिकाणी म्हणजेच वाढे फाटा ,खेड चौक, बॉम्बे रेस्ट्रॉरट चौक, अजंठा चौक,शिवराज पेट्रोल पंप अशा अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीवाची कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. येणा-या काळात असे प्रसंग थांबविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी आजचं हे ‘खड्डे का बर्थ डे’ आंदोलन करण्यात आले.

येत्या ८ ते १0 दिवसांत महामार्गावरील आणि सातारा शहर परिसरातील खड्डे न मुजवल्यास प्रवाशांच्या जीवाशी खेळणा-या प्रशासनास आणि टोलनाक्यांना (आनेवाडी / तासवडे) टोलवसुल करून देणार नाही. तसेच पुढील आंदोलन आणखी आक्रमक प्रकारे करणार आहे.

– वैभव गायकवाड , जिल्हाध्यक्ष, रिपाइं,विद्यार्थी सेना.

error: Content is protected !!