सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :पुणे बेंगलोर महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळ धोम- बलकवडी कालव्या शेजारील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे (रा. सासवड जि. पुणे) हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.
दरम्यान, काही वेळात उतारावरून भरधाव वेगात आलेला मालट्रक क्र .KA- 27 – A – 9019 ने डस्टर, क्रेटा व इर्टिका कारला धडक दिली. यामध्ये क्रेटा कारचा पूर्ण चक्काचूर झाला. खंडाळा व महामार्ग पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. जखमी सहा जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. सर्व जखमी खराडी (पुणे) येथील आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
You must be logged in to post a comment.