खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शांततेत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा येथील साखर कारखान्याचे मतदान वेळे येथील मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत पार पडले. या केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. या मतदान केंद्रावर भुईंज पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कवठे गट नंबर 1 साठी वेळे येथील मतदान केंद्रावर वेळे, गुळुंब, केंजळ, चांदक, आनंदपुर, सुरुर, मोहोडेकर वाडी, कवठे, विठ्ठलवाडी, भिलारेवाडी, पांडे येथील एकूण 277 मतदारांपैकी 225 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सायंकाळ पर्यंत 81.22 टक्के मतदानाची टक्केवारी झाली. एकूण 21 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.

error: Content is protected !!