पाल येथील खंडोबाची यात्रा रद्द

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील १० ते १५ जानेवारीस होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्ट व पाल गावातील मानकरी सोडुन इतर गावातील, जिल्ह्यातील,इतर राज्यातील भाविकांना दर्शनास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची असून, यात्रा कालावधीत 10 ते 15 जानेवारीपासून सतर्क राहायचे आहे. या कालावधीत कोणतीही स्टॉल गाडी लावून द्यायचे नाहीत. याची सर्वस्वी जबाबदारी यात्रा समितीची राहणार आहे. पाल येथे भाविक येऊ नये, यासाठी सुमारे आठ ते दहा किलोमीटरच्या सर्कलमधील परिसरात सील करण्यात येणार आहे.दि.15 जानेवारी रोजी मुख्य दिवशी पाल गाव व आसपासचे 5 किमी पर्यंत दुपारी 12: ‌00 सायंकाळी 7:00 पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे.त्यावेळी कोणतेही भावीकांना मंदिर परिसरात व लग्न सोहळा ठिकाणी येता येणार नाही. संपुर्ण यात्रा कालावधीत सासन काठ्या,मानकरी , पालख्या,बैलगाड्या यांना मनाई करण्यात आली आहे तसेच सर्व दुकाने,स्टाॅल,खेळणी यांना मनाई करण्यात आली आहे. सर्व भाविकांना दर्शनासाठी देवस्थान मार्फत ऑनलाईन सोय करण्यात येणार आहे.

यात्रा कालावधीत पाल यात्रा अनुषंगाने पाल गावाकडे जाणारे रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला असुन काशिळ-पाल- तारळे रोड , उंब्रज-वडगाव-पाल रोड,हरपळवाडी- पाल रोड,मरळी- पाल रोड वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांना प्रशासना तर्फे आवाहन करण्यात येत आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वरील सर्व सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

error: Content is protected !!