जिल्हा बॅंकेच्या ठरावावरून राजकारण पेटलं

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बॅंकेच्या ठऱावावरून माण तालुक्यातील राजकारण तापले असून शनिवारी पानवण, ता. माण येथील नानासाहेब शिंदे यांचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात शेखर गोरेंसह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावरुन माण तालुक्यात अपहरण नाट्याचे प्रकार पहायला मिळत आहेत.बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरुन कायदा, सुव्यवस्था कोलमडून गेल्याचे चित्र पाहायला मिळतेय. बँकेच्या निवडणुकीच्या ठरावानंतर डॉ.नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास सुरु असताना आणखी दोन अपहरणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. माण तालुक्यातील पानवन येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला. रविवारी रात्री उशीरा गुन्हयाची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!