अपहरण आणि जबरी चोरी ५ तासात उघड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथे जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्हयातील आरोपी ५ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण केलेल्या व्यक्‍तीसह कर्नाटक येथे केले जेरबंद

दि.०४/१२/२०२१ रोजी १२.३० वा.चे.सुमारास फिर्यादी साहिल इमाम कोलकर रा.१८५,रविवार पेठ सातारा हे प्रिती एक्सीक्युटीव्ह हॉटेल समोर पान टपरीच्या मालाचे पेमेंट देण्याकरीता गेले असताना त्यांचे पाठीमागून ऑरेन्ज रंगाची स्विफ्ट (क्र.एम.एच.०६ ए.बी.३३२२) आली त्यामधून फिर्यादी याच्या ओळखीचे चार इसमांनी त्यांना मारहाण करुन त्यांचे मोटार सायकलचया डिग्गी मध्ये असणारे ४,००,०००/- रुपये रोख रक्कम, गळयातीन दिड तोळे वजनाची सोन्याचे चेन असा एकूण४,५५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी करुन फिर्यादी यांचा लहान भाऊ निहाल कोलकर यास स्विफ्ट गाडीमध्ये घालून त्याचे अपहरण केले. 

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, ,  यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ  यांचे अधिपत्याखालीस्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार केले. नमुद गुन्हयातील चारही आरोपी हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट क्र.एम.एच.०६ ए.बी.३३२२ मधून कोल्हापूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समजली. गणेश वाघ पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पथकाने नमुद वाहनाचा तात्काळ पाठलाग सुरु केला.

नमुद वाहना बाबत तासवडे, किनी, कोगनोळी टोलनाक्यावर माहिती घेवून त्यांचा चिकोडी ता.चिकोडी, जि.बेळगाव पर्यंत पाठलाग करुन त्यांना चिकोडी ता.चिकोडी, जि.बेळगाव येथे आरोपींचे स्विफ्ट क्र.एम.एच.०६ ए.बी.२३२२ या गाडीस आडवी मारुन त्यामधील दोन आरोपी व अपहृत निहाल कोलकर यास ताब्यात घेवून अपहरण व जबरी चोरीचा गुन्हयातील आरोपींना ५ तासाचे आत कर्नाटक येथून
ताब्यात घेवून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका करुन नमुद आरोपींना पुढील कार्यवाहीकामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाई पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, पो.कॉ.रोहित निकम  सहभागी होते.

error: Content is protected !!