किसन वीर कारखान्याची ताकदीने निवडणूक लढवणार : मकरंद पाटील

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हाच्या राजकारणाचे वैभव म्हणून ओळख जाणारा व किसनवीर आबांचे नाव असलेला हा कारखाना काही झालेतरी वाचला पाहिजे. तुम्ही साथ दिली तर शंभर टक्के निवडणूक लढवून यशस्वी होऊ, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

वाई तालुक्‍यातील भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज वाई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे – पाटील, बाळासाहेब सोलस्कर, शशिकांत पिसाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, किसन वीर आबांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केलेला हा कारखाना उभारताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यावर मात करून १२५० मेट्रिक टनाचा कारखाना सुरु केला. धोम धरणामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले त्यामुळे तात्यांच्या काळात चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेपर्यंत विस्तार करण्यात आला. अवघ्या साडेसहा कोटींचे रेग्युलर कर्ज व सात लाख ३० हजार साखरेची पोती शिल्लक असलेला कारखाना शेवटचा ५० रुपयांचा हप्ता देता न आल्याने तुम्ही कारखाना विरोधकांच्या ताब्यात दिला.

शेतकरी संघटना आंदोलने करत होती. त्यावेळी तात्यांनी एकाकी लढत दिली परंतू अपयश आले. मात्र आज ९५० कोटींचा कर्जांचा बोजा, मागील हंगामातील ऊसांचे बिले मिळाली नाहीत. कामगारांचे २२ महिन्याचे पगार दिले नाहीत. बँकांनी जप्ती आणली आहे. कुठलीही बँक आज कारखान्यास कर्जे देऊ शकत नाही. अशी भयानक परिस्थिती असताना शेतकरी संघटना व सभासद शांत आहेत. कोणीही आंदोलन केले नाही. आम्ही जीव तोडून सांगत होतो. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोडसाळपणे प्रश्न विचारण्यास भाग पाडले. राज्य सरकार मदत करीत नाही असा कांगावा विरोधक करीत आहेत. मागील हंगामातच कारखाना बंद पडला असता परंतू आघाडी सरकारने ३३ कोटी थकहमी दिल्याने कारखाना उशीरा सुरु झाला. त्यावेळी आम्ही मनात आनले असते तर एक छदामही कारखान्याला मिळू दिला नसता. थकहमीचे २२ कोटी शासनास परत न केल्याने कारखाना बंद पडला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

error: Content is protected !!