सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याने गेले आठ महिने झाले तरी शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत.
यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच रयत क्रांती संघटनेने एक रकमी एफआरपी मिळावी असा आग्रह धरला होता. यासाठी जिल्ह्यात आंदोलनेही झाली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केल्यानंतर हंगामाला सुरुवात झाली. मात्र, हंगाम संपून होऊन चार महिने उलटले तरी, किसन वीर कारखान्यांने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यावरून रयत क्रांती संघटनेने कारखान्यांना इशारा दिला होता. वेळेत एफआरपी मिळत नसल्याने अखेर रयत क्रांती संघटनेने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा उपाध्यक्ष प्रकाश साबळे व शेतकरी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.