सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. या काळात धान्य व आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप ती लोकांना मिळाली नाही. ती तातडीने मिळावी, अशी मागणी रिपाइंच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्ग वाढत आहेत. त्याला रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. तसेच गरीबांना धान्य आणि हातावर पोट असणाऱ्या विविध घटकातील लोकांना आर्थिक मदत जाहीर केली. गेल्या पंधरा दिवसांपासून लाॅकडाऊन आहे. अनेक लोकांचा रोजगार गेला आहे. हातामध्ये पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी प्रशासनाकडून शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. तरी शासनाने तातडीने जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर रिपाइं मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोऱ गालफाडे, प्रदेश उपाध्यक्ष आण्णा वायदंडे, सागर फाळके, रघुनाथ बाबर आदींच्या स्वाक्षरी आहेत
You must be logged in to post a comment.