उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावू

खासदार उदयनराजे भोसले यांचे वकील संघटनेच्या बैठकीत आश्वासन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी वकील संघटनेचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्याला माझा पाठिंबा असून कोल्हापुर येथे सर्किट बेंच तयार करण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.

उदयनराजेंनी विधी क्षेत्रातील मान्यवरांशी रविवारी संवाद साधला. याप्रसंगी ॲड.श्रीकांत केंजळे ॲड.व्ही. ई. भोसले,ॲड.प्रशांत खामकर,ॲड. शिवाजीराव मर्ढेकर, ॲड.आबा पवार,ॲड.वसंतराव भोसले,ॲड.शामप्रसाद बेगमपुरे,ॲड. काका पाटणकर,ॲड.महेश कुलकर्णी,ॲड.महेश पाटील आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बँक मार्गे लावण्यासाठी राज्यशास्त्र सोबत बैठक घेऊन विधी खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ते अत्यंत सकारात्मक विचाराचे आहेत, ते निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावतील.यामध्ये कुठल्याही प्रकारे मी कमी पडणार नाही. मी बोलतो ते करून दाखवतोच असेही उदयनराजे म्हणाले.

वकील चांगल्या पद्धतीने समाजाला शिस्त लावू शकतात, स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. साधारण आयटी पार्क तयार करायचा आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी उत्पादनावर आधारित आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र शासनाने ‘नमामि गंगे’ हा प्रकल्पासाठी घेतल्या त्यामध्ये आपल्या कृष्णा नदीचा देखील सर्वे करण्यात आला असून लवकरच केंद्र शासनाच्या माध्यमातून नदी शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

मी शिक्षित बेरोजगार.. त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ

वकील, डॉक्टर किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करायचे असेल तर डिग्री आवश्यक असते. राजकारणात कुठलीही डिग्री गरजेचे नाही. मी तर सुशिक्षित बेरोजगार असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे, अशी उदयनराजेंनी मिश्किल टिपणी करताच, बैठकीत हशा पिकला.

error: Content is protected !!