सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अवयव प्रत्यारोपण या चळवळीला जरी खूप वर्षांपासून सुरुवात झाली असली तरी आजही अवयवदानाचे प्रमाण खूप नगण्य आहे. आज लाखो लोक वेगवेगळ्या अवयवाच्या प्रतिक्षेत असून आपण सर्वांनी मिळून अवयवदान करण्याचा संकल्प केला पाहिजे. अवयवदान करूया,नवीन जीवनदान देऊ या, असे आवाहन कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक धीरज गोडसे यांनी केले.
कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनच्यावतीने अवयवदान जनजागृती व प्रत्यारोपण मार्गदर्शन ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अवयवदानाचे महत्व जाणून जिल्हातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अवयवदान व अवयव प्रत्यारोपण या संदर्भात माहिती मिळावी म्हणून कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनला परवानगी दिली. त्याचाच एक भाग म्हणून सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना या संदर्भात मार्गदर्शन करून अवयवदानाचे महत्व कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक धीरज गोडसे यांनी विषद केले.यावेळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.व्ही.हंकारे,पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.