कोंडवेत वाहनांच्या तोडफोडीमुळे दहशत

कोंडवेत वाहनांची तोडफोड करण्यात आली.

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा)– सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात वातावरणात कडाक्याची थंडी पडली असतान ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. रविवारी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या कारणावरून कोंडवे, ता. सातारा येथे दोन गटात निर्माण झालेल्या चुरशीमुळे एका गटाने गावातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा जिल्हयातील अनेक गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाली आहे. सातारा जिल्हयातील संवेदनशील गाव म्हणून ओखळल्या जाणाऱ्या कोंडवे ग्रामपंचायतीचाही यामध्ये समावेश आहे. गावातील मुस्लिम समाजाच्यावतीने जमीन आयुब शेख यांची शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पॅनेलमधून भरण्याचे निश्चित केले. त्यानुसार जमीन शेख शिवगणेश प्रभागातून अर्ज दाखल केला.

याचा राग मनात धरून अज्ञाताने मागास वस्तीच्या मोकळ्या जागेत लावलेल्या जमीर शेख यांच्या घऱासमोर लावलेली रिक्षा, जीप याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!