कोरेगावात नगरसेवक आणि मुख्याधिकार्‍यांनी केला कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) ; सध्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. तसेच मृतांचा एकदा वाढत आहे. अशा परिस्थिती मृतांवर अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक घटना कोरेगाव शहरात झाली. नगरपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी नगरसेवक आणि मुख्याधिकार्‍यांनी कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार केला.

कोरेगावात नगरपंचायत कर्मचारी संपावर गेले असल्याने कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. संपावर तोडगा काढण्याची चर्चा सुरु असतानाच एका कोरोनाबाधित वृध्देचा मृत्यु झाल्याची माहिती समजली. कर्मचारी संपावर असल्याने काय करता येईल, याचा विचार सुरु असतानाच आपणच सगळे मिळून अंत्यसंस्कार करुया, असा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्षा सौ. मंदा बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनील बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, संतोष कोकरे, किशोर ना. बर्गे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी केदारेश्‍वर मंदिराच्या पिछाडीस असलेल्या कैलास स्मशानभूमीत पीपीई कीट धारण करुन कोरोनाबाधित वृध्देवर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार होईपर्यंत कुटुंबातील एक घटक या नात्याने सुनील बर्गे यांची सकाळपासून धावपळ सुरु होती.

error: Content is protected !!