कोरेगाव नगरपंचायतीसमोर नगरसेवकांनीच टाकला कचरा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या बंद असून, कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ पाच नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी एकत्रित येऊन नगरपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचरा ओतला.

कचरा समस्येबाबत पदाधिकारी व प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहूल रघुनाथ बर्गे व सुनील बर्गे यांनी हे आंदोलन केले. कोरोना कालखंडात नगरपंचायतीची जशी आर्थिक स्थिती बिकट झाली आहे तशीच कचर्याची परिस्थिती आहे. सत्ताधारी कचरा समस्या सोडविण्याऐवजी दुर्लक्ष करत आहेत. डिझेल अभावी घंटागाड्या उभ्या होत्या. आमदार महेशदादा शिंदे विचारमंचच्या माध्यमातून आम्ही स्वखर्चाने घंटागाड्यांमध्ये डिझेल भरण्यास सुरुवात केली.

संपूर्ण शहरातील कचरा दोन दिवसातच उचलण्याचे नियोजन केले, मात्र ही बाब पदाधिकार्यांना खटकली. कचरा विषयाचे राजकारण करुन सत्ताधारी शहरातील वातावरण दुषित करत असल्याचा आरोप राजाभाऊ बर्गे यांच्यासह या नगरसेवकांनी केला.

error: Content is protected !!