कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला इतर जिल्हातील चळवळींचा पाठींबा.

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन आज १० व्या दिवशी सुरूच आहे. यामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, ठाणे व पालघर जिल्ह्यात विभागलेले साडेपाचशे मूळ खातेदार व सव्वीस हजार प्रकल्पग्रस्त यामध्ये सहभागी झाले आहेत.याला पाठिंबा म्हणून श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने इतर जिल्ह्यात असलेल्या चळवळीच्या वतीने एक दिवसाचे धरणे धरून पाठिंबा देण्यात आला.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील उरमोडी, तारळी, वांग, धोम व कण्हेर, या धरणातील प्रकल्पग्रस्त, व कराड विमानतळ, कासार शिरंबे येथील ग्रामस्थ. सांगली जिल्ह्यातील वांग, वारणा व चांदोली अभयारण्यग्रस्त व दुष्काळी भागातील समान पाणी चळवळीतील गावे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा व चांदोली अभयारणयग्रस्त आणि आजरा तालुक्यातील उचंगी, सर्फनाला व चित्री धरणग्रस्त, सोलापूर जिल्ह्यातील कण्हेर, धोम, व उजनी धरणग्रस्त. रत्नागिरी जिल्ह्यातील चांदोली अभयारणयग्रस्त, गडनदी धरणग्रस्त. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नऊ गाव खारेपाट मधील शेतकरी, पुणे जिल्ह्यातील वीर बाजी पासलकर व पानशेत धरणग्रस्त व औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी व टेम्बापुरी धरणग्रस्त ,दिघा घर बचाव समिती नवी मुंबई
मोठया प्रमाणात सहभागी झाले आहेत.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले की सरकारने या कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यावर या धरणग्रस्तांच्या पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातील इतर समाजघटक व जनता मोठया संख्येने रस्त्यावर उतरेल. व त्यांना आवरणे सरकारला जड जाईल.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सांगली जिल्हाध्यक्ष ऍड. कृष्णा पाटील म्हणाले, गेली ६४ वर्षे हे प्रकल्पग्रस्त शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी लढा देत आहे. हे जर सरकारला समजत नसेल तर याला काही वेगळे वळण लागले तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. मग मात्र दोष या वेळी देऊ नये असे यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!