सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कृष्णानगर येथील सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेवर असलेली पाटबंधारे विभागाची वसाहत आज बुलडोजरच्या साह्याने पाडण्यात आली. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांनी विरोध केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने मान्यता दिली असून महाविद्यालयाची इमारत उभी करण्यासाठी जलसंपदा विभागाची कृष्णानगर येथील जागा दिली आहे. परंतु या जागेमध्ये पाटबंधारे विभागाची वसाहत असून या वसाहतींमध्ये राहणाऱ्या 35 कुटुंबीयांना पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर घरे मोकळी करण्याची नोटीस पाठवली होती.
हे सर्व रहिवाशी अनधिकृतरित्या त्या ठिकाणी बांधकाम करून तसेच कोणत्याही प्रकारचा भाडे न देता राहत होते. पाटबंधारे विभागाने त्यांना घरे खाली खाली करण्याची नोटीस दिल्यानंतर या रहिवाशांनी पर्यायी जागेची मागणी केली. परंतु ही मागणी कायदेशीरदृष्ट्या वैध नसल्याने शासनाने आज ही वसाहत येथील घरे पाडण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी सातारा शहर पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलडोजरच्या साह्याने घरे पाण्यात असताना अनेक नागरिकांनी विरोध दर्शवला त्यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
You must be logged in to post a comment.