सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गुरूवारी तिसºया दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आजपर्यंत दाखल झालेल्या एकुण अर्जांची संख्या २९ झाली आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुर्वी सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर गुरूवारी आणखी २३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये माजी अध्यक्ष तथा संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या मातोश्री नुतन मोहिते यांनीही अर्ज दाखल केला आहे. गुरूवारी वडगाव हवेली-दुशेरे गटातून विंग येथील उत्तम विष्णू खबाले आणि दुशेरे येथील उत्तम तुकाराम पाटील, काले-कार्वे गटातून कार्वे येथील अमरसिंह बाळासाहेब थोरात आणि काले येथील विजय निवृत्ती पाटील, सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातून रेठरे हरणाक्ष येथील जयवंत दत्तात्रय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उरूण-इस्लामपूर येथील शिवाजी आप्पासाहेब पवार, बहे येथील संभाजी भगवान दमामे आणि मीनाक्षीदेवी संभाजी दमामे, बोरगाव येथील मानाजी प्रल्हाद पाटील, कामेरी येथील पोपट रंगराव कदम, येडेमच्छिंद्र-वांगी गटातून येडेमच्छिंद्र येथील बाबासाहेब वसंतराव पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
रेठरे बुद्रूक-शेणोली गटातून कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक अविनाश जगन्नाथ मोहिते यांनी २ तर त्यांच्या मातोश्री नुतन जगन्नाथ मोहिते यांनी एक असे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून शिरटे येथील शिवाजी उमाजी आवळे आणि बेलवडे बुद्रूक येथील बाजीराव वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव गटातून रेठरे बुद्रुक येथे नूतन जगन्नाथ मोहिते यांनी दोन तर अर्चना अविनाश मोहिते यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय दुशेरे येथील क्रांती तानाजी पाटील, बहे येथील मीनाक्षीदेवी संभाजी दमामे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.इतर मागास प्रवर्गातून विंग येथील वसंतराव बाबुराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव गटातून धोंडेवाडी येथील अमोल बापूराव काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
You must be logged in to post a comment.