सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक २९ जून रोजी होत आहे. गुरूवारी, दि. १७ रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरीस ६६ उमेदवारी अर्ज रिंगणात उतरले. त्यामुळे ही निवडणूक डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेल, डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेल व अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेल यांच्यात होणार आहे.
ही निवडणूक सत्ताधारी सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलच्या विरोधात माजी अध्यक्ष डाॅ. इंद्रजीत मोहिते यांच्या रयत व अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने एकत्र यावे, यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी प्रयत्न केले. परंतु दोन्ही माजी अध्यक्षांमध्ये मनोमिलन होऊ शकले नाही. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महत्वाची भूमिका राहणार असून त्यांनी अद्याप कोणत्याही पॅनेलला पाठिंबा दर्शवला नाही. पंरतु आपले समर्थक तिन्ही पॅनेलमधून उभे केले आहेत. तर उदयसिंह उंडाळकर यांच्या गटाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिला आहे. तसेच विश्वजीत कदम यांनी रयत पॅनेलच्या पाठीशी आपली ताकद लावली असून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे उमेदवार – धोंडिराम शंकरराव जाधव, जगदीश दिनकरराव जगताप, सयाजी रतन यादव, दयाराम भीमराव पाटील, गुणवंतराव यशवंतराव पाटील, निवासराव लक्ष्मण थोरात, दत्तात्रय हणमंत देसाई, लिंबाजी महिपतराव पाटील, संभाजीराव आनंदराव पाटील, जयवंत दत्तात्रय मोरे, जितेंद्र लक्ष्मणराव पाटील, संजय राजाराम पाटील, शिवाजी बाबूराव पाटील, बाबासो खाशाबा शिंदे, डॉ. सुरेश जयवंतराव भोसले, बाजीराव दाजी निकम, विलास ज्ञानू भंडारे, इंदुमती दिनकर जाखले, जयश्री माणिकराव पाटील, वसंतराव बाबुराव शिंदे, अविनाश मधुकर खरात यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार – डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते, डॉ. सुधीर शंकरराव जगताप, बापूसाहेब भानुदास मोरे, सुभाष रघुनाथ पाटील, सयाजीराव यशवंतराव पाटील, दत्तात्रय भगवान थोरात, अजित विश्वासराव पाटील, मनोहर रघुनाथ थोरात, प्रशांत वसंतराव पाटील, गणेश ज्ञानदेव पाटील, अनिल भिमराव पाटील, विश्वासराव संपतराव मोरे – पाटील, विवेकानंद भगवान मोरे, संजय जगन्नाथ पाटील, बापुसो गणपतराव मोरे, बापूसो नानासो पाटील, अधिक राव लक्ष्मण भंडारे, शंकरराव ज्ञानदेव रणदिवे, आनंदराव संभाजी मलगुंडे, सत्वशीला उदयसिंह थोरात, उषा संपतराव पाटीलसंस्थापक पॅनेलचे उमदेवार – उत्तम तुकाराम पाटील, अशोक मारूती जगताप, सुजित पतंगराव थोरात, सर्जेराव रघुनाथ लोकरे, विजयसिंह जयसिंग पाटील, पांडूरंग यशवंत पाटील, सुभाष उद्धव पाटील, विक्रमसिंह शहाजीराव पाटील, मारूती राजाराम मोहिते, शिवाजी अप्पासाहेब पवार, महेश राजाराम पवार, उदयसिंह प्रतापराव शिंदे, बाबासाहेब वसंतराव पाटील, माणिकराव आनंदराव मोरे, अविनाश जगन्नाथ मोहिते, अधिकराव जयवंत निकम, शिवाजी उमाजी आवळे, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे, उमा अजित देसाई, मिलिंद पांडूरंग पाटणकर, नितीन शंकर खरात यांचा समावेश आहे.
You must be logged in to post a comment.