सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २९) अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. या निवडणुकीसाठी सरासरी ७३ टक्के मतदान झाले. गुरुवारी (दि ) रोजी कराड येथे मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीत डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
कोरोना आणि लाॅकडाऊनमध्येही कृष्णा कारखान्याची निवडणुक जाहीर झाल्याने सातारा व सांगली दोन्ही जिल्ह्यातील वातावरण गत महिनाभरापासून ढवळून निघाले होते. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल विरोधात डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे रयत पॅनेल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल असा हा सामना रंगला होता. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गुरुवारी कार्यक्षेत्रातील गावात १४८ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान शांततेत पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने कोणत्याही मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसली नाही. सकाळी १० वाजता २१ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ वाजता ते ३५ टक्के वर पोहचले. दुपारी २ वाजता ५९ टक्के तर ४ वाजता ७० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ वाजता सरासरी ७३.२५ टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी (दि. १) कराड येथील शासकीय गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे. मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
You must be logged in to post a comment.