सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन रुग्णांचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपचार वेळेत होऊन मृत्युच्या संख्येत घट होण्यासाठी रॅट टेस्टींग तसेच आरटीपीसीआर टेस्टींगची महत्वाची भूमिका असणार आहे. नमुन्यांचे अहवाल 24 तासाच्या आत आपल्या कार्यक्षेत्रातील शासकी यंत्रणेस (तालुका आरोग्य अधिकारी) यांना ईमेलद्वारे किंवा व्हॉटस्अपद्वारे अहवाल कळविणे बंधनकारक आहे. नियम पाळणार नाही त्या लॅबची मान्यता रद्द करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना टेस्टींग करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व लॅबला कळविले आहे.
टेस्टींग करण्यात आलेल्या पॉझिटीव्ह व निगेटीव्ह अशा सर्व रुग्णांची नोंदी ऑनलाई पोर्टलवर तात्काळ भरण्यात यावी. जेणेकरुन मिळणाऱ्या अहवालावरुन योग्य ती उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत होईल.
संशयित रुग्णांचा नमुना तपासणीसाठी घेतल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर नोंद करताना आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना घेते वेळेस एसआरएफ आयडीवर त्याचा संपूर्ण सविस्तर पत्ता सध्या वास्तव्य करीत असलेला (जिल्हाबाहेरील असेल तर) किंवा आधारकार्डवर असलेला पत्ता प्रमाणित करुन नमुद करण्यात यावा. संपूर्ण पत्ता नमुद केला तरच पॉझिटिव्ह रुग्णाचा शोध घेणे व संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन उपायोजना राबविण्यास जिल्हा प्रशासनास सोयीस्कर होईल. तसेच रुग्णांचा सुरु मोबाईल नंबर लिहिण्यात यावा यासाठी मिसड कॉल देऊन प्रत्यक्ष रुग्णाचा मोबाईल नंबर आहे का याची खात्री करुन घ्यावी.
पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाचा अहवाल देतेवेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन आयसीएमआर नंरबर संहित तात्काळ देण्यात यावा. फॅसेलीटी ॲप मध्ये ऑटकम अपडेशन (डिस्चार्ज, डेथ, रेफर) करत्यावेळेस आसीएमआर नंबर शिवाय अपडेट करता येत नाही, याची नोंद घ्यावी. तसेच रुग्णांचा अहवाल देतेवेळेस ज्या नावाने आपल्या चाचणी केंद्रास परवानगी दिलेली आहे. त्याच लेटर हेडवरती संबंधितास अहवाल देण्यात यावा.
शक्य झाल्या त्यांचा नमुना तपासणीचा अहवाल मोबाईलवर ॲटोमॅटीक मॅसेज जाण्यासाठी क्लाऊड पॅथॉलॉजी या साफ्टवेअरचा वापर करावा. जेणेकरुन रुग्णांना वेळेत अहवाल मिळू शकेल व अहवालासाठी बाहेर फिरण्याची d आकारण्यात यावी. या सर्व सुचंनाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा आपल्या लॅबची मान्यता पूर्णपणे रद्द करण्यात येईल व आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब कळविले आहे.
You must be logged in to post a comment.