सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्वंयपाक घरात गॅसचा भडका होऊन भाजून गंभीर जखमी झालेल्या सातारा पोलीस दलाच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत असलेल्या महिला अंमलदार संगिता काळेल (रा. पोलीस वसाहत, सातारा) यांचे शनिवारी रात्री पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलीस कर्मचारी संगीता काळेल या बुधवार, दि. १२ रोजी भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी प्रथम पुणे येथील खासगी रूग्णालयात त्यानंतर ससून सर्वोपचार केंद्र येथे दाखल करण्यात आले होते. पंचावन्न टक्के भाजलेल्या संगिता यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
या घटनेमुळे सातारा पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, संगीता काळेल यांचा मृत्युपूर्व जबाब घेण्यात आला असून पुण्यातून कागदपत्रे सातार्यात आल्यानंतरच नेमकी घटना समोर येणार आहे असे पोलिसांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.