साताऱ्याच्या महिला वनअधिकारी दिपाली चव्हाण यांची मेळघाटात गोळी झाडून आत्महत्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण ( वय ३२) यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांनी चार पानी सुसाईट नोट लिहून वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण या मूळच्या साताऱ्याच्या आहेत.

 दीपाली या आईसोबत सातारा येथे राहत होत्या. सध्या त्यांची पोस्टिंग मेळघाटमधील हरिसाल येथे वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून झाली होती. त्यांचे पती राजेश मोहिते चिखलदरा कोषागार कार्यालयात कार्यरत आहेत. सातारा येथे त्यांची आई एकटीच असल्याने त्या काही दिवसांपूर्वीच दीपाली चव्हाण यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, गुरुवारीच त्या सातारला परतल्या.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल (25 मार्च) सायंकाळी साडे सात वाजता  त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. तसे आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात. रात्री-बेरात्री भेटायला बोलावतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे. यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. आपण गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हती, तरी मुद्दामहून तीन दिवस मालूरच्या  कच्च्या रस्त्याने फिरविले. यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोटमध्ये महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आला. काम केल्यानंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला. या आत्महत्येमुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!